नमस्कार,
गेल्या काही दिवसापासून बऱ्याच जणांचे फेसबुक प्रोफाईल्स क्लोन होत असल्याच्या तक्रारी सतत पाहायला मिळत आहेत. काहीजण याला अकाउंट हॅक झाला असं म्हणत आहेत. पण अकाउंट हाक होणं आणि क्लोन होणं यात फरक आहे.
हॅक वि. क्लोन:
अकाऊंट हॅक होणे म्हणजे कुणीतरी तुमच्या अकाउंटचा पूर्ण ऍक्सेस घेऊन त्याचा दुरुपयोग करत आहे. या परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीकडे तुमच्या फेसबुक अकाऊंटचा पूर्ण ऍक्सेस असू शकतो.
अकाउंट क्लोन होणे म्हणजे समोरच्या व्यक्तीने तुमचा प्रोफाइल फोटो डाउनलोड करून एक नवीन अकाउंट तयार केला आणि तुमचा अकाउंट असल्याचं तुमच्या ओळखीतल्या लोकांना भासवलं. यासाठी ते सहसा तुमच्या प्रोफाइलचे बरेच फोटो डाउनलोड करून त्याच्या प्रोफाइल वर अपलोड करू शकतात व तुमच्या ओळखीतल्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी चॅट करतात व पैशाची मागणी करतात.
अकाउंट हॅक झाल्यावर काय करावे?
सर्व प्रथम तुमचा पासवर्ड तुम्हाला बदलावा लागेल व थोडा स्ट्रॉंग पासवर्ड निवडावा लागेल. जर हॅकरने पासवर्ड बदलला असेल तर तो रिसेट करावा लागेल
यापुढे अकाउंट हॅक होऊ नये म्हणून काही काळजी घ्यावी जसं कि,
१. वेब वरून फेसबुक अकाऊंट ओपन करा
२. उजव्या बाजूला छोटा डाऊन एरो असतो त्यावर क्लिक करून सेटिंग्स क्लिक करा व नंतर सेक्युरिटी अँड लॉगिन क्लिक करा.
३. थोडं स्क्रोल केल्यावर Two-Factor authentication हा ऑप्शन इनेबल करा
४. तिथेच थोडं स्क्रोल केल्यावर "Setting up extra security" असे ऑप्शन मिळेल ज्यात “Get alerts about unrecognized activity” असा ऑप्शन आहे. त्यासमोर एडिटचे बटन क्लिक करा.
५. जर कुणी अनोळखी जागेवरून लॉगिन केले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन कोणत्या पद्धतीत मिळावं ते सिलेक्ट करा.
अकाउंट क्लोन झाल्यावर काय करावे?
१. तुमच्या प्रोफाईलवरून "नवीन अकाउंट तुमचा नाही व पैशाची मागणी झाल्यास देऊ नका" या आशयाचा एक मेसेज टाकावा.
२. त्या प्रोफाइलमध्ये गेल्यावर रिपोर्ट प्रोफाइल चा ऑप्शन असतो तो सिलेक्ट करावा व तुमच्या मित्रांनाही करायला सांगावे.
३. जर तुमची फ्रेंडलिस्ट सगळ्यांसाठी ओपन असेल तरच अशा प्रकारे क्लोनिंग होऊ शकतं. फ्रेंडलिस्ट लपवण्यासाठी खालील स्टेप्स करा.
- वर मांडलेल्या स्टेप्स नुसार सेटिंग्ज मध्ये जा व त्यात प्रायव्हसी ऑप्शन निवडा
- उजवीकडे "How People Can Find and Contact You" मध्ये, "Who can see your friends list." हा ऑप्शन असेल. त्यात एडिट बटन क्लिक करुन फ्रेंड्स किंवा ओन्ली मी सिलेक्ट करा.
या कोणत्याही कारणाने घाबरण्याचे काही कारण नाही. शक्यतो पोलीस कम्प्लेंट करा जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसू शकेल. अनोळखी लोकांना प्रोफाइल पाहिल्याशिवाय फ्रेंडलिस्टमध्ये ऍड करू नका. यासंदर्भात काहीही माहिती लागली तर connect@subodhmestry.com वर तुम्ही मला तुमचा प्रश्न पाठवू शकता.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र